मुंबई : राज्यातील ड्रग्स प्रकरणावरुन सुरु झालेलं राजकारण आता अंडरवर्ल्डपर्यंत पोहचलं आहे. मलिकांनी ड्रग्स प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले होते. त्यानंतर मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. त्यानुसार फडणवीसांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मलिकांचे १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत जमीन व्यवहार केल्याचे पुरावे समोर आणले. तेव्हा मलिकांनी मी हायट्रोजन बॉम्ब फोडणार असं म्हटलं.
आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवर फेकले ऑईल; सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं
नवाब मलिकांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना रियाज भाटी नावाचा उल्लेख केला. दोन पासपोर्ट बनवणाऱ्याला अटक केलेली असताना २ दिवसांत कसं सोडलं? असा दावा मलिकांनी केला. रियाज भाटी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतो असं म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा केला.
मी राष्ट्रवादीचाच – रियाज भाटी. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून ते काम करत होता. पहा काय म्हणतोय रियाज भाटी https://t.co/uOxHVy5EsH
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 10, 2021
केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये रियाज भाटीच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हापासून रियाज भाटी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जनरल सचिव म्हणून तो काम करत होता असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रियाज भाटी प्रकरणावरुन नवाब मलिक स्वपक्षालाच अडचणीत आणतायेत का? असा प्रश्न निर्माण होतो.
महाविकास आघाडीतील नेते घरात घेण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांनी बिग बॉसमध्ये जावं – राणे
रियाज भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाज भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
Read Also :
- डुकराशी कुस्ती करू नका, तुमचेचं आंग घाण होईल; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांवर पलटवार
- नोटाबंदीनंतर फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे – मलिकांचा बाँम्ब
- दाऊदशी संबंध असलेला रियाझ भाटी फडणवीसांसोबत जेवण कसा घ्यायचा? – नवाब मलिक
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानेचा आणि मणक्याचा त्रास; लवकरच शस्त्रक्रियेची शक्यता
- एसटी कर्मचाऱ्यांना दणका: महामंडळाकडून कारवाईला सुरूवात, 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन