राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आणि काही आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे तर दुसरीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना परिस्थितीचा आढावा घाइत्नयासाठी अनेक शहरातून भेटी देत आहे त्यामुळे बहुदा फडणवीसांना कोरोनाची थोडी भीती मनात आहे. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र आणि भाजपमधील सहकारी गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं. ‘गिरीश, मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका’ या फोनमुळे महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि बराच वेळ काय बोलावं हेच त्यांना सूचलं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण राज्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. प्रत्येक शहर आणि जिल्ह्यातील पालिका आणि आरोग्य प्रशासनाशी चर्चा करतानाच कोविड रुग्णालयात जाऊन पाहणीही करत आहेत. करोना रुग्णांची भेट घेऊन त्यांचीही ते आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. त्याशिवाय भाजप कार्यकर्त्यांनी करोना रुग्ण आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी केलेल्या खानपानाच्या व्यवस्थेचाही ते आढावा घेत आहेत.
"गिरीश, मला कोविड झाला तर मला मुंबईत सरकारी दवाखान्यात भर्ती करा": देवेंद्र फडणवीस!
गिरीश महाजन यांच्या अंगावर जसा सर्रकन काटा आला, तशीच अवस्था अवघ्या महाराष्ट्राची!
आई भवानी जगदंबे, तुझ्या ह्या सुपुत्राला-देवेंद्राला उदंड आयुष्य दे! pic.twitter.com/sBAmBk5Zw9— Adv. Rakhi Barod। ರಾಖಿ ಬರೋಡ (@BarodRakhi) July 13, 2020
दरम्यान, फडणवीस यांच्या या संभाषणाचा मेसेज ट्विटरवर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी फडणवीस हे करोना होईल या मानसिकतेत फिरत असल्याचं म्हणत आई, भवानीने फडणवीस यांना उदंड आयुष्य द्यावे, अशी प्रार्थनाही केली आहे. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही ट्विट करत आई जगदंबे, माझ्या नेत्याला सदैव निरोगी ठेव व त्यांच्या हातून गोरगरीबांची, महाराष्ट्राची सेवा घडत राहो, असं म्हटलं आहे.
आई जगदंबे, माझ्या नेत्याला सदैव निरोगी ठेव व त्यांच्या हातुन गोरगरीबांची, महाराष्ट्राची अशीच सेवा घडत राहो@Dev_Fadnavis pic.twitter.com/4MSGMVFk1i
— Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) July 12, 2020