उमरगा : राज्यात दररोज लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तरीही सरकारला त्या पीडितांच्या किंकाळ्या ऐकू कशा येत नाहीत, आक्रोश कसा दिसत नाही. महिलांचे व मुलींचे अब्रूचे रक्षण करता येत नसेल तर असले कायदे चुलीत घाला असे म्हणत, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ राज्य सरकारवर गरजल्या.
तालुक्यातील एका विट भट्टीवर काम करणाऱ्या विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार झाला होता. ह्या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नाहीत. त्यामुळे त्या पीडिताच्या भेटीसाठी चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी त्यांनी पीडित महिलेची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी भाजपकडून त्या महिलेला एक लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली. यावेळी वाघ यांनी पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा करून आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.राज्यातल्या लेकीबाळींच्या किंकाळ्या,आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का ? असा संतप्त सवाल देखील चित्र वाघ यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना वाघ म्हणाल्या, राज्यात अद्याप महिला आयोगाला अध्यक्षच नाही, तर दाद कुणाकडे मागायची ? राज्यात दिशा कायदा कधी आणणार असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. राष्ट्रवादीवर टीका करताना चित्रा वाघ सत्तेवर असणारे गेल्या वेळी विरोधात असताना महिलांच्या लैंगिक अत्याचाराबद्दल रान उठवत होते. आता गप्प का आहेत असा सवाल करीत, त्या म्हणाल्या शाहू, फुले यांचे विचार प्रत्यक्षात कधी अमलात आणणार, यापुढे राज्यात महिलावरील अत्याचार कमी नाही झाले तर मंत्र्यांच्या गाड्या अडविणार आहोत.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दता कुलकर्णी, तालुकाअध्यक्ष कैलास शिंदे, जिल्हा सरचिटणीस माधवराव पवार, जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे ,उमरग्याचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेवक अरुण इगवे, किरण रामतिर्थे, राजू मिनियार, लक्ष्मी पाचाळ, अनिल बिराजदारसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उमरग्याच्या वीटभट्टीवरील मजूरमहीला वयवर्ष ३० आज तिची भेट घेतली
८ दिवस डांबून केलेला लैंगिक अत्याचार,शरीरावरच्या जखमा आहेतचं पण मनावरील जखमा ज्याची मोजदाद शासनदरबारी नाहीचं.
४ ही आरोपी फरार…..या राज्यातल्या लेकीबाळींच्या किंकाळ्या त्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का ?? pic.twitter.com/xFrdbxxJLU
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 9, 2020
Read Also
रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा ! तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल… भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल https://t.co/EiyqYbSZKe#SharadPawar #RohitPawar #NCP @GopichandP_MLC #GopichandPadalkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 10, 2020