नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पुढच्यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहू शकतात. भारताकडून या क्षणी उपस्थित राहण्यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर ब्रिटनकडून जॉन्सन हे भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही.
पंतप्रधान मोदींनी 27 नोव्हेंबरला बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे औपचारिक आमंत्रण दिल्याचे सांगितले जाते.
We can’t confirm one way or other, PM Boris Johnson keen to visit India as soon as possible: British High Commission Spokesperson to ANI on reports of India’s invitation to UK PM for Republic Day
— ANI (@ANI) December 2, 2020
यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, ब्रिटिश पंतप्रधान लवकरात लवकर भारतात येण्यास उत्सुक आहेत, असे ब्रिटिश उच्चायुक्ताच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
यापूर्वी 1993 साली जॉन मेजर हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ब्रिटनचे शेवटचे पंतप्रधान होते.