अलिबाग : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्र प्रेम अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये आजही राज ठाकरेंची क्रेझ असल्याचे दिसून येते. एवढेच काय पण सत्ता नसताना किंबहुना जास्त आमदार खासदारांचे पाठबळ नसताना देखील सर्वसामान्य लोक राज ठाकरेंकडे आश्रयाला जात असल्याचे अनेकदा पहायला मिळाले. सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या काळातही राज ठाकरेंकडे जिम संघटना, रिक्षा संघटना अशा अनेक व्यावसायिक संघटनांनी धाव घेतल्याचे पहायला मिळाले.राज ठाकरे यांना महाराष्ट्रा विषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम त्यांच्या कार्यकर्त्यांन विषयी देखील असल्याचे काल अलिबाग येथील एका प्रसंगावरून दिसून आले.
काल अलिबाग येथील ‘रोरो’ कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंनी जवळ घेऊन आपुलकीने विचारपूस केली आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांची सुरु असलेल्या कामांबाबतची चौकशी देखील केली. तसेच रो रो कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी एक छायाचित्र देखील काढले.
‘राजसाहेबांचा महाराष्ट्र,महाराष्ट्राचे राजसाहेब’ या हॅशटॅगचा वापर करत हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार पद्धतीने व्हायरल होत आहे. कोरोना होण्याची कसलीही चिंता न करता, संपूर्ण कोरोना काळात अगदी सर्वसामान्य मराठी नागरिकांना सहज भेट देणाऱ्या राज ठाकरेंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे म्हणत अनेक मनसे सैनिकांकडून ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असताना देखील काही सत्ताधारी नेते घरात बसून जनतेची दिशाभूल करत आहेत तर, एकीकडे कृष्णकुंजवर भेटायला येणार्या सर्व मराठी बांधवांना राज ठाकरे विनामास्क आपुलकीने जवळ घेऊन विचारपूस करत आहेत असे या पोस्टमध्ये मनसैनिक म्हणताना दिसत आहेत.
Read Also
PM मोदींच्या जन्मदिवसाच्या दिवशी मोठा अपघात ! भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी | VIDEO |https://t.co/hTkxzSjWat#PMModiBirthday #BJP #PMO
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 19, 2020