मुंबई : कल्याण शहरातील पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान लाँचिंग आहे का? यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशा शब्दांत मनसेचे कल्याणचे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला आदित्य ठाकरेंची उपस्थित होते. त्यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केली आहे. त्यांनी इतर रखडलेल्या कामांमध्येही लक्ष घालावं, असंही राजू पाटील यांनी म्हटलं आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज 2 वर्षे रखडलेल्या पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम सुरु केले गेलं. यावरून आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. त्यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर यावेळी निशाणा साधला.
कल्याण शहरातील पत्री पुलाला जोडणाऱ्या 90 फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरु झालं. पुढील दोन दिवस हे काम चालणार आहे. विशेष म्हणजे या लाँचिंगच्या वेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर खोचक टीका केली आहे.
दरम्यान, पत्री पुलाचं गर्डर लॉंचिंगचं काम पाहण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे गेले असता त्यांची वाट पोलिसांनी अडवली. त्यामुळे राजू पाटील प्रचंड संतापले होते. त्यांनी थेट शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
आमदार राजू पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हे गर्डर लाँचिंगसाठी कल्याणला आले होते. त्यांनी केवळ पत्री पूल कामाची पाहणी न करता ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पूल यांचीही कामं मार्गी लावावीत. पत्री पुलाचे गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही, असा टोला देखील लगावला.
Read Also :
पुढील पंधरा वर्षे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता, ‘या’ नेत्यांनी एकत्र येत व्यक्त केला विश्वास
ईडी चौकशी: टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
‘शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं’
हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणून ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला नाही: देवेंद्र फडणवीस
मोदी सरकारने ‘सीबीआय’ची पानटपरी केली आहे, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याची टीका
तृणमूल काँग्रेसचे ५ खासदार भाजपप्रवेशाच्या तयारीत, ‘या’ भाजपा खासदाराच्या दाव्याने खळबळ