IMPIMP
It is my luck that the Prime Minister of the country calls my name half the time today, what a simple thing Sharad Pawar said. It is my luck that the Prime Minister of the country calls my name half the time today, what a simple thing Sharad Pawar said.

” माझं भाग्य की देशाचा प्रधानमंत्री आज निम्म्या वेळेला माझं नाव घेतो, काय साधीसुधी गोष्ट आहे का?”, शरद पवारांनी डिवचलं

पुणे : भाग्य माझं की देशाचा प्रधानमंत्री आज निम्म्या वेळेला माझं नाव घेतो. काय साधीसुधी गोष्ट आहे? काटेच्या वाडीचा चमत्कार त्यांना कळला आणि म्हणून कुठेही गेले तर ते माझ्याबद्दल बोलत होते. मी सांगितलं एका ठिकाणी की इथून पुढच्या निवडणुका असतील तर मोदी साहेब तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा. कारण त्यांनी लक्षात ठेवलं टीकाटिप्पणी केली तर मतं उलटी होतात, ते आपण याही निवडणुकीत पाहिलं. असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. काटेवाडी येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, यंदाची निवडणूक वेगळी होती,पण माझं मन सांगायचं की, बारामतीकर साथ सोडणार नाही. मन जे सांगायचं ते शेवटी खरं झालं. ही निवडणूक संघर्षातून गेली. दोन-चार ठिकाणी दोन चार बुथवर कमी जास्त मत पडली असतील. पण जे लोक सांगत होते की काहीच पडणार नाही. तिथं पडले, चांगले पडले आणि सबंध मतदारसंघामध्ये पडले. या वेळेले एक प्रकारची शक्ती दिल्ली पासून लावली. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले, माळशिरस तालुक्यामध्ये, कराडला, अहमदनगरला, नाशिकला, नागपूरला, औरंगाबाद. १८ ठिकाणी ते आले त्या १८ पैकी आठ की नऊ ठिकाणी निवडणुकीचा एकच विषय होता शरद पवार..!

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

उद्या आणखी निवडणुका येतील लोकसभेची झाली, विधानसभेची येईल, कारखान्याची येईल. प्रत्येक ठिकाणी योग्य निकाल घ्यायचे मतदान करायचे आणि लोकांच्या हिताचे राजकारण करायचे हे सूत्र घेऊन आपल्याला काम करायचे आहे.  याच्यासाठी तुम्हा लोकांची एकी हवी आहे. काही लोक दिसत नाहीत. मी गेले दोन दिवस बारामती तालुक्यात हिंडतोय. माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी गेलो तर अनेक लोक त्या ठिकाणी येतात, सगळे नेते असतात. आता या निवडणुकीत मी जातोय सगळीकडे नव्या पिढीची, गरिबांची, सामान्य लोकांची गर्दी दिसते. पण नेते दिसत नाही कुठे. असेही शरद पवार म्हणाले.

नेते कुठे गेले कळत नाही, मालिका गँग बाजूला झाली असे हे म्हणतात. आपल्याला दुरुस्ती करायची आहे, लोकांच्या जीवनात फरक करायचा आहे आणि त्यासाठी स्वच्छ व्यवहार याच्याशी तडजोड करायची नाही. जिथे मलीदा गॅंगचा जे काही उद्योग असेल ते कुणाचाही असो त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवू आणि परिसर हा दुरुस्त करू एवढंच काम करायचंय त्यासाठी तुम्ही जागरूक रहा. असाही इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा…“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार 

दरम्यान, कुठलीही निवडणूक आली त्यासाठी जागरूक रहा. तुमच्या जागरुकीच्या जोरावर आपण चित्र बदलू आणि ते चित्र बदलायचे आहे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात बदल करायचा आहे, महाराष्ट्रात राज्य आणायचाय. आणि महाराष्ट्रात राज्य आणून जे काही लोकांचे सुख दुःख आहे. त्यातून लोकांची सुटका करायची आणि एक स्वच्छ, चारित्र्यसंपन्न राजकारणाची समाजकारणाची सुरुवात करायची आहे. एवढेच मी या ठिकाणी सांगतो. नेते कुठेही गेले तरी सामान्य लोक कुठे गेले नाही हे सुप्रियाच्या निवडणुकीत मी बघितलं. पन्नास टक्के महिलांची जी संख्या आहे त्या महिलांनी सुद्धा आपलं काम चोख केलं त्यामुळे या ठिकाणी यश आलं त्याच रस्त्याने जाण्याचा निर्धार आपण करूया, पाऊलं टाकूया मी तुमच्या बरोबर आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

READ ALSO :

हेही वाचा..“रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देऊ नये ;” थेट लोकसभेच्या सरचिटणीसांना नोटीस 

हेही वाचा…“जागावाटपाची बोलणी करायला आता मला घेऊन चला, १०० सिट्स मागा”, कदमांची शिंदेंकडे मागणी 

हेही वाचा…“मोदींना आमंत्रण देतोय, विधानसभेला प्रचार आतापासून सुरू करा”, ठाकरेंनी मोदींना डिवचलं 

हेही वाचा..कार्यक्रम सुरू असताना वीज गेली, लंकेंनी थेट कार्यक्रमातच वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला झापलं 

हेही वाचा..लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू 

Leave a Reply