वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे. यावरून एका बाजूला महायुती मनसेचं जल्लोषात स्वागत करत आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक मनसे आणि भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडतांना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी यावरून खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“ना भुजबळ, ना गोडसे, नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा ‘हा’ नवा उमेदवार सज्ज “
वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आर्वी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी जयंत पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली. महाराष्ट्रात भाजपला राज ठाकरेंची मदत घ्यावी लागली. इतकी भाजपची अवस्था वाईट आहे. “सुपारी वाजवणारा” अशी पदवी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना दिली होती. आपण काय बोलतो आणि आपली कृती काय असते याची भान भाजपला राहिलेले नाही. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, तुमची आमची लूट करून धनिकांच्या घर भरण्याचा यांचा अट्टाहास आहे. सर्व भ्रष्टाचारी नेत्यांवर पांघरुण घालत त्यांना खुशाल पक्षात घेण्याचे काम सुरू आहे. आपले आमदार अनिल बाबू देशमुख यांनी मात्र सर्व संकटांवर मात करून एकनिष्ठ राहण्याची शिकवण आपल्याला दिली. असा मामा मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. मामा इतका धैर्यवाना असेल तर भाचाही तितकच धैर्यवान असेल या निष्कर्षानेच आम्ही उमेदवार म्हणून अमर काळे यांची निवड केली. असेही त्यांनी म्हटलंय.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. अमर काळे यांच्या प्रचारार्थ आर्वी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला त्यास उपस्थित राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची तत्व, विचार समान आहेत. तुतारी हे नवीन चिन्ह… pic.twitter.com/mHDzbaqoaA
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला
हेही वाचा…“धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण,” अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?
हेही वाचा…बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यात वेगाने हालचाली सुरू