सोलापुर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. माढा लोकसभेसाठी इच्छूक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासातच मोहिते पाटलांनी भाजपला जय महाराष्ट्र केला आहे. यातच माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवतारेंनी माघार घेतली, अजितदादांकडून बारामतीकरांसाठी आश्वासनांची खैरात वाटली
भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज झालेत. अशातच मोहिते कुटुंबासह रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील मोहिते पाटलांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे येत्या दोन ते तीन दिवसात शरद पवार गटात दाखल होऊन त्यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकर ग्रासले”, पक्षांतर्गत आणखी एक वाद चव्हाट्यावर
यातच यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आम्ही त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. आम्ही त्यांचा मान, सन्मान ठेवण्याचा कायम प्रयत्न केला आहे. त्यात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मात्र पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीत त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देणं योग्य नव्हतं. कारण जनता मोदींच्या पाठीशी आहे.
तर दुसऱ्या बाजूला आज माढा लोकसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची देवगिरीर बैठक पार पडली. या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याच्या सुचना अजित पवारांनी दिल्या. या बैठकीसाठी अजित पवार गटातील सर्वच नेते उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…शिरूरमध्ये ठाकरे गट आक्रमक, नियोजित दौरा रद्द करण्याची कोल्हेंवर नामुष्की ओढावली
हेही वाचा…“ना भुजबळ, ना गोडसे, नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा ‘हा’ नवा उमेदवार सज्ज “
हेही वाचा…“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल
हेही वाचा…“ताई काळजी करू नका विजय तुमचाच”, अल्पसंख्याक समाजातील महिलांची अर्चना पाटलांना ग्वाही
हेही वाचा…“शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील, त्यांनाच निवडून द्या,” अपुर्व पाटलांचं आवाहन