पुणे : एक आठवड्यापुर्वी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे सोनाई डेअरीचे प्रवीण माने यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्रवीण माने यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. जवळपास २५ वर्ष सोबत असलेल्या प्रवीण मानेंनी अचानक साथ सोडल्याने सुळेंना याचा मोठा धक्का बसला. त्यानंतर आता इंदापुरात शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून त्यांनी ‘ईट का जवाब पत्थर’चा दिल्याचा समोर आला आहे.
हेही वाचा…मनसेचा महायुतीला पाठिंबा, पुण्यात मतांचं विभाजन, कुणाच्या पथ्यावर पडणार ?
पुणे जिल्हा भाजपचे दोन वेळा जिल्हाध्यक्ष राहिलेले नामदेव ताकवणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका बाजूला पवार विरूद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढत असताना या प्रवेशामुळे दौंडमध्ये खासदार सुप्रिया सळे यांना मोठं बळ मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ताकवणे यांच्या तीन पिढ्या या भाजप व आरएसएससोबत राहिलेल्या आहेत. भीमा पाटस सहकार साखर कारखान्याचा ५०० कोटींचा भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता.
हेही वाचा…रवींद्र धंगेकरांच्या पाठीमागे शुल्ककाष्ठ ; धंगेकरांचा प्रचार थांबवा; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना वरिष्ठांच्या सूचना
दरम्यान, इंदापुरच्या दौऱ्यावर आले असता हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी प्रवीण माने यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अजितदादांच्या राष्ट्रवादीत जात असल्याची घोषणा केली. या पक्षप्रवेशानंतर ताकवणे नाराज झाल्याने त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..म्हणून आढळरावांना मतदारसंघात जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय,” अतुल बेनकेंनी सांगितली खरी हकीकत
हेही वाचा…“अर्चना पाटलांवर महायुतीच्या तिन्ही पक्षांतील नेतृत्वाचा प्रभाव,” म्हणाल्या.. “माझ्या जडणघडणीत..,”
हेही वाचा…पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश ?
हेही वाचा…“महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल”, सुनेत्रा पवारांचा आज भोर दौरा
हेही वाचा…अपघात की घातपात ? नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात, एकच खळबळ