सोलापुर : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून मिळालेल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आपले उमेदवार घोषीत केले आहेत. मात्र पवारांनी अद्यापही माढा लोकसभेत आपला उमेदवार घोषीत केला नाही. अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याठिकाणी भाजपने पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज असल्याची माहिती आहे. यातच आता मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब होणार असल्याने भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय?” राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुनावलं
गेल्या अनेक दिवसांपासून अकलुजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार हे आता अखेर निश्चित झालं आहे. मोहिते पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तींनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा…सातारा अन् रावेरसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घोषीत, माढ्याचा तिढा अजूनही कायम
अकलुजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिलीय. मोहिते पाटीट कुटुंबीय घरवापसी करणार असल्याने भापजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल”, सुनेत्रा पवारांचा आज भोर दौरा
हेही वाचा…अपघात की घातपात ? नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात, एकच खळबळ
हेही वाचा…मनसेचा महायुतीला पाठिंबा, पुण्यात मतांचं विभाजन, कुणाच्या पथ्यावर पडणार ?
हेही वाचा…रवींद्र धंगेकरांच्या पाठीमागे शुल्ककाष्ठ ; धंगेकरांचा प्रचार थांबवा; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना वरिष्ठांच्या सूचना
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार”,अदिती तटकरेंचा विश्वास