मुंबई : गुढीपाडव्या निमित्ताने झालेल्या शिवतीर्थ मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी आहे. असे राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकडून टिका केलीय.
हेही वाचा…“मोहोळांच्या साधेपणाने पुणेकरांची जिंकली मनं”, रांगेत उभं राहून घेतलं तांबडी जोगेश्वरीचं दर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या! असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…अजितदादाच्या उमेदवाराच्या गाड्याची भाजपकडून तोडफोड ; पवार गटाची भाजपच्या विरोधात आयोगाकडे धाव
तर तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील! pic.twitter.com/UhHvMhLxF6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2024
READ ALSO :
हेही वाचा…सातारा अन् रावेरसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घोषीत, माढ्याचा तिढा अजूनही कायम
हेही वाचा…“जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही”, अजित पवारांनी बारामतीत ‘नेमका’ कुणाला दिला इशारा
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला
हेही वाचा…“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता …”