नवी दिल्ली : संपुर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. तर काही राज्यांत विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील आपापल्या उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू केला आहे. यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडली असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे.
हेही वाचा…अर्चना पाटलांच्या दौऱ्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचाराला दमदार सुरूवात
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरूणाचल प्रदेशमध्येही निवडणुका लढविण्याचं ठरवलं आहे. याठिकाणी लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. अशातच निवडणुकासाठी प्रचाराला गेलेल्या अजित दादांच्या नेत्याची गाडी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडली असल्याची घटना समोर आलीय. अरूणाचल प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष लिया सय्या आपल्या प्रचारासाठी गेले असता त्यांच्या गाड्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे.
हेही वाचा…“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
लिका सय्या हे अरूणाचल प्रदेशमधले राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत. ते लोकसभा निवडणुकीसोबत अरूणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत होते. या निवडणुकीसाठी अजित पवार गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात लिका सय्या यांचा देखील समावेश आहे. यातच प्रचाराच्या वेळी लिका सय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडली तेव्हा इशान्य भारतातील नेत्यांनी अजित पवारांसोबत जायचा निर्णय घेतला.
यातच आता अरूणाचल प्रदेशमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. तर ४ जूनला निवडणुकीचे निकाल लागणार आहे. त्याआधीच झालेल्या प्रकाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात निवडणुक आयोगात तक्रार दाखल केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी साहेबांना मग मुलीला अन् आता सुनेला निवडून द्या”, बारामतीत अजित पवारांची जोरदार फटकेबाजी
हेही वाचा…कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली
हेही वाचा…“मी मुरलीची मुरली वाजवतो की आव्हाडांची पुंगी वाजवतो, हे भविष्यात दिसेल”, वसंत मोरेंनी फटकारलं
हेही वाचा…“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर
हेही वाचा…“तुमच्या “धन की बात” ला आमची “जन की बात” भारी पडणार”, ओमराजे निंबाळकर यांचा विरोधकांवर एल्गार