मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपुरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. बाळासाहेबांची खरी शिवसेना आमच्यासोबत असून तिकडे डुबलिकेट शिवसेना बसली आहे. असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून मोदींना प्रत्युत्तर देत भाजपच्या विरोधात जोरदार फटकेबाजी केली आहे.
हेही वाचा…“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ
आज मुंबईत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ठाकरेंनी मोदींवर टिका केली आहे. यावेळी ठाकरे म्हणाले की, काल तीन गोष्टींचा एकत्र योग, सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, असा योग पहिल्यांदा देशात आलाय. हा फार विचित्र योग. काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं. ज्याला शिवसेनाप्रमुख कमळाबाई म्हणायचे. मी ज्या पक्षाला भाकड, भेकड, भ्रष्ट जनता पक्ष म्हणतो. त्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांचं होतं. आम्ही यापुढे जे उत्तर देऊ. ते पंतप्रधानांना उत्तर दिलं असं समजू नये. आमच्याकडून देशाच्या पंतप्रधानांचा अनादर होणार नाही. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“आतापर्यंत अजितदादांशी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा,” शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते. भ्रष्ट तितुका मेळवावा भाजप पक्ष वाढवावा, मोदींनी स्वतः जवळ चायनीज माल ठेवावा. जेव्हा शिवसेना निर्माण झाली तेव्हा मोदी हिमालयात असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना खरी शिवसेना माहीत आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.
यातच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा कार्यक्रम पार पडला. राज्याच्या ४८ लोकसभा मतदारसंघापैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात जास्त २१ जागा, कॉंग्रेसला १७ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा देण्यात आल्या आहेत. यात सांगली आणि भिवंडी जागेवरून जो वाद सुरू होता. त्यावर आता पुर्णविराम लागला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…भोसरीचे चाणक्य विलास लांडे आढळरावांच्या सोबतीला, लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, २१,१७,१० महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ
हेही वाचा…“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा
हेही वाचा…“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द