पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुट प्रकरणानंतर बारामतीत पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगणार आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता दोन्हीही उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास जोरदार सुरूवात केली आहे. याच दरम्यान अजितदादांवर टिका करणाऱ्या, तसेच त्यांना थेट चलेंज करणाऱ्या शिंदेंच्या शिवतारेंनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार पुरंदरच्या दौऱ्यावर आल्या असतांना झालेली भेट आता चर्चेची ठरली आहे.
हेही वाचा…“अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही”, कल्याणमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला मनसेचा विरोध
बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याच्या चर्चा असताना विजय शिवतारे आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवारांंविरोधी भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि सुनेत्रा पवार यांना पाठींबा दर्शवला.
यानंतर आता सुनेत्रा पवार विजय शिवतारेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने या भेटीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या. सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही विजय शिवतारेंची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी आतापर्यंत अजितदादांनी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा असं विजय शिवतारे सुनेत्रा पवारांना म्हणाले.
यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, सासवड इथून जाताना बापूंच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी बापू म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी भूमिका जरूर वेगळी होती. मात्र राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. आता दोस्तीचे नवे पर्व सुरू होताना पुरंदर हेवेलीतील जनतेचे काय हित साधले गेले? हे स्वतः मुखमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सासवडमध्ये येऊन सांगणार आहेत. दि.११ रोजी होणाऱ्या त्या मेळाव्यानंतर सर्व वातावरण स्वच्छ होईल. खऱ्या अर्थाने तो दिवस बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या विक्रमी विजयात महत्वाचा ठरणार आहे असेही त्यांनी सांगून मनापासून शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा…“अनंत गितेंवर तटकरेंचा जोरदार प्रहार,” तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला
हेही वाचा…“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात
हेही वाचा…“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला
हेही वाचा…“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं काही दडपण आहे का ? सुनेत्रा पवारांनी दिले ‘हे’ उत्तर