चंद्रपुर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात होत आहे. याठिकाणी महायुतीने भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना संधी देण्यात आलीय. यातच आज मोदींची सभा मतदारसंघात होत असल्याने भाजपने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले आहे. यावरून आता धानोरकर यांनी भाजपला टोला लगावला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘रावेर’साठी सक्षम उमेदवार शोध संपला, ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर
प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, कॉंग्रेसच्या उमेदवाराची भीती भाजपला वाटत असेल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा चंद्रपुरात होत आहे. परंतु मतदार हा सुजाण आहे, जाणकर आहे. त्यांना कुणाला मत द्यायचं हे माहिती आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे कितीही दिग्गज नेते प्रचारासाठी उतरले तरी चंद्रपुर जिल्हा हा इतिहास रचणारा, घडवणारा जिल्हा आहे. मागच्या निवडणुकीत देखील कॉंग्रेसचा एकच खासदार चंद्रपुर जिल्ह्यातून निवडून गेला होता. तोच इतिहास यावेळी देखील कायम राहणार असल्याचे प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातून कॉंग्रेसचा फक्त चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आला होता. परंतु लोकसभेच्या निकालाच्या दोन वर्षानंतरच बाळु धानोरकर यांचं निधन झालं. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणुक झाली नाही. मात्र कॉंग्रेसने यासाठी मोठी तयारी सुरू केली. यातच हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली असून मोदींनाच याठिकाणी प्रचाराला उतरवलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं काही दडपण आहे का ? सुनेत्रा पवारांनी दिले ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही”, कल्याणमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला मनसेचा विरोध
हेही वाचा…“कुणी पैसे वाटले तर घ्या, मात्र मत महाविकास आघाडीलाच करा,” मावळाच्या उमेदवाराचा अजब गजब मतदारांना सल्ला