पुणे : ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उन्हाचा तडाखा सहन करत राज्यातील विविध पक्षाचे उमेदवार आपला प्रचार करतांना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा इतका असतांनाही उमेदवारांना लोकांचा उत्सुर्फ प्रतिसाद बघायला मिळत आहे. याचाच अनुभव बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना आला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत तो सुखद अनुभव कथन केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना येणारे अनेक अनुभव भारावून टाकणारे ठरत आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकाकडून देखील मिळत असलेले प्रेम पाहून अनेकदा गलबलूनच येते. असाच एक अनुभव आज पुन्हा एकदा आंबेगाव येथे घेतला.
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
येथील नागरिकांशी संवाद साधत असताना भर तळपत्या उन्हात मी महायुतीच्या पदाधिकारी, स्थानिक नागरिकांसह रस्त्याने चालतच फिरत होते. जनतेच्या प्रेमाची सावली उन्हाचा तडाखा जाणवूच देत नव्हती. याच प्रेमाची शितल झुळूक सफाई कामगार महिला भगिनींनी देखील दिली. माझ्या डोक्यावर त्यांनी त्यांच्या प्रेमाची सावली पांघरली. त्याचे झाले असे, की भर दुपारच्या उन्हात रस्त्यावरून जात असताना माझ्या स्वागतासाठी काही सफाई कामगार महिला उभ्या होत्या. त्या सर्वजणी मला भेटायला आल्या.
हेही वाचा…“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
माझ्याशी आपुलकीने बोलल्या. त्यांनी आणलेला बुके मला प्रेमाने दिला. मला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचे मोल अनमोल आहे. त्यामुळे त्या शुभेच्छांचा मी विनम्रतापूर्वक स्वीकार केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासह या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी मनाशी आधीच बांधलेली खूणगाठ निर्धाराने आणखी घट्ट केली. भरल्या मनाने त्यांचे आभार मानले. असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“उत्तराला अर्धवट तोडून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अर्चना पाटलांकडून स्पष्टीकरण
हेही वाचा…दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’, ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग
हेही वाचा…बच्चू कडूंनी भाजपचा दबाव झुगारला, अकोल्यासह रामटेकमध्ये महायुतीवर बच्चू कडूंचा प्रहार
हेही वाचा…““माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार”, एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, शरद पवारांना मोठा धक्का
हेही वाचा…“संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ”, आपली लेक म्हणून सर्वांनी मला पाठिंबा द्यावा “,अर्चना पाटलाचं मतदारांना आवाहन