जळगाव : भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असून माझा पक्ष प्रवेश चंद्रपुरच्या सभेत नाही तर दिल्लीत होणार, असे मोठं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे. त्यामुळे खडसे भाजपात जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय.
हेही वाचा…“सुसंस्कृत पुण्याची परंपरा, तळजाई टेकडीवर उजळली”, सुनेत्रा पवार अन् धंगेकरांमध्ये रंगल्या राजकीय गप्पा
येत्या पंधरा दिवसात भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलावणं येईल. त्याच दिवशी माझा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. असे म्हणत भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. परंतु भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बंर होईल. अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये होती. चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरू होती. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलीय.
हेही वाचा…“महायुतीचा धर्म पाळणार, तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार”, रायगडमध्ये निर्धार मेळावा
दरम्यान, गेले अनेक वर्ष मी घरामध्ये राहिलो आङे. चाळीस ते बेचाळीस वर्ष ज्या भाजपमधअये राहिलो. त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता. काही कारणासाठी माझी नाराजी झाली. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलो. माझ्या नाराजीची तीव्रता आता कमी झाली असून मी आता पुन्हा पक्षात प्रवेश करत आहे. माझ्याविषयी कुणाची नाराजी असेल तर मी ते दुर करण्याचा प्रयत्न करेन. त मला तुरूंगात टाकण्याचा कुठलाही धाक माझ्या मनात नव्हता. मी जामीनावर आहे. त्यामुळे मला पर्मनंट जामीन मिळाला आहे. त्यामुळे केस चालत राहील आणि मला कोणी उठून जेलमध्ये टाकेल अशी परिस्थिती नाही. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“संकल्पबद्ध होण्याची हीच ती वेळ”, आपली लेक म्हणून सर्वांनी मला पाठिंबा द्यावा “,अर्चना पाटलाचं मतदारांना आवाहन
हेही वाचा…नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
हेही वाचा…“राजेंद्र राऊतांचा मला भावासारखा पाठिंबा मिळणार, अन् माझाच विजय होणार”, अर्चना पाटलांचा विश्वास
हेही वाचा…“सध्याच्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना विनोद तावडेंनी चिटपट केलेय”
हेही वाचा…“आढळराव पाटील हा काम करणारा माणूस, जुन्नरमधून शिवाजी दादांना सर्वाधिक मते पडणार “, आमदार अतुल बेनके