रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून पुन्हा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून पांरपारिक प्रतिस्पर्धी अनंत गिते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी आता महायुतीकडून जोरदार प्रचाराला सुरूवात करून दिली आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?
यातच काल रायगड लोकसभआ निवडणुकीच्या अनुषंगाने अलिबाग येथे तालुका स्तरावर मित्रपक्ष भाजपच्या बुथ कार्यकर्ता व सुपर वॉरियर्स संमलेन पार पडलं. यावेळी लोकसभा निवडणुकांसंदर्भात नियोजन देखील मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत ठरवण्यात आलं. सर्वाधिक मताधिक्क्यानं महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करू असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला सर्व भाजप नेते व प्रमुख पदाकिऱ्यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार असून सुनील तटकरे यांना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार अशी ग्वाहीही देण्यात आली.
हेही वाचा…“तटकरे पुन्हा ‘रायगडचा किल्ला’ भेदून खासदार होणार ?” रायगड लोकसभेची राजकीय गणितं काय ?
यावेळी आमदार रवीशेठ पाटील , लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, गिरीश तुळपुळे, भाजप नेते हेमंत दांडेकर, अलिबाग विधानसभा निवडणूक प्रमुख दिलीप भोईर, सरचिटणीस ऍड . महेश मोहिते, राज्य प्रतिनिधी, राजेश मापरा, सोपान जांभेकर, सरचिटणीस गीता पालेरेचा, उदय काटे, . मंजुषा कुद्रेमोती, माणिकदादा बळी, पल्लवी तुळपुळे, उपध्याक्ष वैकुंठ पाटील यासह मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…बारामतीत सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा धक्का, प्रवीण माने, दशरथ मानेंचा अजित पवारांना पाठिंबा
हेही वाचा…“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”, पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना
हेही वाचा…महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांनी साधला, झैनी मशिदीत बोहरी बांधवांशी संवाद
हेही वाचा…“फडणवीसांचा खडसेंना विरोध नाही, ते आले तर स्वागतच”, खडसेंचा भाजप पक्ष प्रवेश ठरला
हेही वाचा…“भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटविरुद्ध काँग्रेस वाद भडकला”, कॉंग्रेसने दिला हा इशारा