जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. यातच खडसे यांनी मध्यंतरी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं. त्यामुळे खडसे जर पुन्हा भाजपात आले तर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. यात पक्षात कोणीही आलं तर त्याला आमचा विरोध नसणार अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
पक्षात येण्यासाठी आम्ही कुणालाही रोखू शकत नाही. राज्यात केंद्रीय समिती जर विचार करेल तर खडसे साहेब यांना विरोध करण्याचं काहीही कारण नाही. विकसीत भारताच्या संकल्पासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली ज्यांना ज्यांना भाजपात यायचं आहे. त्यांना त्यांना आम्ही पक्षात प्रवेश देऊ. मग आमच्या पक्षात गेलेले असो किंवा कॉंग्रेसचे असो कोणालाही घ्यायला आम्ही तयार आहोत.
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
देवेंद्र फडणवीस यांचा कधीही एकनाथ खडसे यांना विरोध नाही. उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हे फडणवीस यांनी दिलं आहे. ते आमचे नेते होते. त्याकाळात देखील देवेंद्र फडणवीस यांना सहकार्य केले आहेत. त्यांच्या मनातला कमी झालेला नाही. असेही ते म्हणाले.
दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या भवितव्यासाठी खडसे भाजपात येण्यावाचून थांबले आहेत. अशीही चर्चा आहे. यातच मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच. लढ़ेंगे और जीतेंगे असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटविरुद्ध काँग्रेस वाद भडकला”, कॉंग्रेसने दिला हा इशारा
हेही वाचा…एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश निश्चित, परंतु रोहिणी खडसेंच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले ?
हेही वाचा…“तटकरे पुन्हा ‘रायगडचा किल्ला’ भेदून खासदार होणार ?” रायगड लोकसभेची राजकीय गणितं काय ?
हेही वाचा…काल फडणवीसांसोबत चर्चा, आज उमेदवारी रद्द, वंचितने बांदल यांची केली उमेदवारी रद्द
हेही वाचा…घराणेशाहीची ऐशीतैशी..! विदर्भातील १० पैकी ०४ उमेदवार घराणेशाहीतील