जळगाव : लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय घडामोडी वेगाना सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उमेदवार बदलण्यात येत आहेत तर अनेक ठिकाणी नाराज असलेले नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतांना दिसत आहेत. यामुळे राज्यात मोठा घोळ असून याचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच आता शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”
एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावर खडसे यांचे कुटुंब नेहमीच संभ्रम निर्माण करते. आताही भाजपमध्ये येणार येणार अशा चर्चा असल्या तरी ते येतील तेव्हा आम्ही आमच्या खास कार्यशैलीने त्यांचे स्वागत करू, या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत मांडले आहे.
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा
एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर महाजन म्हणाले की, स्वागतच करणार आहेत ना.. ज्यावेळी येतील तेव्हा ना. ठरू तर द्या मुहुर्त. हे सर्व जर तरचे प्रश्न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपप्रवेश करणआर हे सर्व समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतूनही येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू, असे सूचक वक्तव्य मंत्री महाजन यांनी केले.
दरम्यान, एकनाथ खडसे पुढील दोन दिवसांत भाजपच्या आपल्या स्वगृही परतणार असल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. परंतु त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या राजकीय भवितव्यावर घोडे अडले आहे. असा दावा करण्यात येत आहे. यातच खडसे दोन दिवसापुर्वी दिल्लीही जाऊन आल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“तटकरे पुन्हा ‘रायगडचा किल्ला’ भेदून खासदार होणार ?” रायगड लोकसभेची राजकीय गणितं काय ?
हेही वाचा…काल फडणवीसांसोबत चर्चा, आज उमेदवारी रद्द, वंचितने बांदल यांची केली उमेदवारी रद्द
हेही वाचा…घराणेशाहीची ऐशीतैशी..! विदर्भातील १० पैकी ०४ उमेदवार घराणेशाहीतील
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा