पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळावा घेतला. त्या आधी वंचितकडून उमेदवारी जाहीर झालेले मंगलदास बांदल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक मिनिटे चर्चा केली. त्यामुळे वंचितने आता मंगलदास बांदल यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द करण्याची घोषणा केलीय. वंचितने आतापर्यंत घोषीत केलेल्या उमेदवारांना पुन्हा घरी बसवल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार”, आघाडीत पेच वाढला, विशाल पाटलांनी जाहीर केली आपली भूमिका
वंचित बहुजन आघाडीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र वंचितचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी काल पुरंदरमध्ये फडणवीस यांच्याशी भेट घेतली. यामुळे बारामतीतच उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला. त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची उमेदवारी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा…““निवडणुकीसाठी समोर प्रचंड माया गोळी गेलीय,”मुश्रीफांच्या हेलिकॉप्टरच्या विधानाचा जयंत पाटलांनी घेतला समाचार
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं मोठं आव्हान असणार आहे. यातच वंचितने याठिकाणी मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती. मात्र महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. तर दुसऱ्या बाजूला वंचितने काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. तर काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत . यामुळे आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…घराणेशाहीची ऐशीतैशी..! विदर्भातील १० पैकी ०४ उमेदवार घराणेशाहीतील
हेही वाचा…“जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देणार”, आघाडीत ‘या’ जागेवरून कॉंग्रेसची आक्रमक भूमिका
हेही वाचा…प्रणिती शिंदेंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न ; आचारसंहितेमधून मिळणार मुभा
हेही वाचा..“बाळासाहेबांच्या रिमोट कंट्रोलने चालणाऱ्या कमळाबाईंच्या रिमोट कंट्रोलने आता शिंदेंची शिवसेना चालते”
हेही वाचा…विजय शिवतारेंची मागणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सासवडमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जाहीर सभा