अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत आहे. तसा तसा प्रचाराला चांगलाच वेग आलाय. अशातच अकोल्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टिका करत अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील असे वादग्रस्त विधान केलंय. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय.
हेही वाचा...शिवसेना, राष्ट्रवादीतील फुट कोल्हेंच्या पथ्यावर पडणार ? शिरूरचं राजकीय गणितं काय ?
अकोला लोकसभेतून कॉंग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी नाना पटोले अकोल्यात आले असता त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावर कॉंग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? असंवेदनशीलतेचा हा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा ! खा. संजय धोत्रे जी यांना दीर्घायुष्य लाभावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे फडणवीस यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा...सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई
अकोल्यात तिरंगी लढत अटळ झाली आहे. कॉंग्रेसचे अभय पाटील यांच्या विरोधात महायुतीने अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे याठिकाणी आता कोण बाजी मारणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुलेंचा कोश्यारींनी अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यांतर पोलिसांना निलंबित केले गेले. हेच लोक असेच करू शकतात. मी २०१४ साली ते २०१७ पर्यंत खासदार होतो. त्याकाळात नोटबंदी आणि जीएसटी आली, त्यावेळेस मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध केला. त्यावेळी अकोल्याचे खासदार देखील होते. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील . असं वादग्रस्त विधान पटोले यांनी केलं.
काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?
असंवेदनशीलतेचा हा कहर आहे.
निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.… pic.twitter.com/9TKD9z9Wmj— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा..“मुहुर्त ठरू तर द्या..”, खडसेंच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजनांचं सुचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा...जळगावात ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार , ३० माजी नगरसेवक फुटणार, राजकीय भुकंप अटळ
हेही वाचा…अन् वसंत मोरेंनी ससून रूग्णालयाला भेट दिला उंदिर पकडण्याचा पिंजरा, दिला ‘हा’ इशारा
हेही वाचा..“बारामतीची लढाई कौटुंबिक नाही, भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा,” सुनेत्रा पवार
हेही वाचा…कॉंग्रेसच्या नेत्यांनी राऊतांच्या कार्यक्रमाला फिरवली पाठ ; सांगलीच्या जागेवरून वाद आणखी वाढला