मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी भिवंडी लोकसभेतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या येवई येथील आर. के. लॉजी पार्क या गोदाम बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विरोधकांवर कारवाई केलीच जाते, मात्र आता निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांवर देखील अशा प्रकारे दबाव आणत असल्याचे सत्ताधारी पक्षांकडून दिसून येत आहे. त्यामुळे विरोधक आता आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार
काल बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाली आणि आज थेट कारवाई करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा सुरू झालीय. यावर एमएमआरडीएची राजकीय दबावातून कारवाई सुरू असल्याची प्रतिक्रिया बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिलीय. यावर बोलतांना ते म्हणाले की, काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन तासानंतर एमएमआरडीचे दोन अधिकारी कांबळे आणि सोनवणे अधिकारी माझ्या गोदामावर पोहचले. अधिकारी वर्ग यावेळी मोठ्या प्रमाणात होता. त्यांनी तर मला स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला वरून खुप दबाव आहे. कपिल पाटील यांनी त्यांच्यावर दबाव निर्माण केलाय.
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान
माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना त्यांच्या पराभावाची कल्पना देखील आहे. चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारे कारवाई केली असल्याचीही प्रतिक्रिया दिली आहे. यातच भिवंडी लोकसभेतून म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. .
READ ALSO :
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,
हेही वाचा…नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?
हेही वाचा…“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार
पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत
हेही वाचा.“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”