परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष बदलून जाहीर केलेले उमेदवार मागे घेत नव्या उमेदवारांना संधी दिली जात आहे. अशातच परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांची राष्ट्रवादी पुरस्कृत महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचितने सुरूवातीला बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्या जागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आलीय. पंजाबराव डक यांनी गुरूवारी परभणीतून वंचितचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
आतापर्यंत वंचितने तीन उमेदवार बदलले आहेत. रामटेकमध्ये वंचितकडून यापुर्वी शंकर चहांदे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे माघार घेत असल्याचे सांगत शंकर चहांदे यांनी कॉंग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला. तर यवतमाळ-वाशिममध्ये यापुर्वी सुभाष पवार यांना रिगणात उतरवले. मात्र त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलला आणि त्यांच्या जागी अभिजीत राठोड या तरूण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार
हेही वाचा…अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान
हेही वाचा…“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
हेही वाचा…“आठ दिवस ईडी सीबीआय माझ्याकडे द्या, मग मी..” संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा..‘धक्कादायक बातमी…! शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर बीडमध्ये प्राणघातक हल्ला, बीड हादरलं…