बीड : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुर ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. बुधवारी सांयकाळी ही घटना घडली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हेगारांचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
ज्ञानेश्वर खांडे नेहमीप्रमाणेच बीडहून आपल्या गावीकडे निघाले होते. मात्र बीडपासून काही अतंरवार त्यांची गाडी गेली असता काही जणांनी गाडी आडवली. खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबतच्या इतर दोघांनाही मारहाण करण्यात आली आहे. खांडे हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बीड जिल्ह्याच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा…“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदीही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ
ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पुढचा तपास करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार कोणत्या हेतूने करण्यात आलाय. याची माहिती काही दिवसानंतर समोर येण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजप आमदाराची पत्नी घड्याळ चिन्हावर निवडणुक लढणार ? अर्चनाताई पाटील अजितदादा गटात दाखल ?
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन