अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून शरद पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील आमदारांनी सुजय विखे पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
लोकप्रतिनिधीला इंग्रजी-हिंदी समजते की नाही हे महत्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा, त्यांच्या अडचणींची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार माहीर आहेत. नाहीतर इंग्रजी-हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची, प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या काही कमी नाही. असो! भाषा किंवा शिक्षण यावरुन कर्तृत्व सिद्ध होत नाही. टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो.. पण याच अविर्भावात तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर तुमचेच बारा वाजतील. असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार
दरम्यान, अहमदनगर मधून लोकसभेसाठी उभे असलेले महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना डिवचलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे पाटलांनी त्यांचं संसदेतील इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवला. त्यानंतर याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवी तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे थेट आव्हानच विखेंनी लंकेंना दिलं. त्यावर आता विखेंना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे.
दरम्यान, सुजय विखेंनी केलेल्या टिकेवर पुण्यातील राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला. आपला बाप मंत्री होता, कारखानदार होता, आपण कॉन्व्हेन्ट मध्ये शिकलात. निलेश लंके यांचे वडील गरीब शेतकरी, लंके स्वतः चहा विकून उदरनिर्वाह करायचे. तुझ्यासारखी श्रीमंत बापाची पोरं गरिबाला हिनवण्यातच समाधान मानतात, विखे मनाने अगदीच भिकारी निघाले. असा जोरदार पलटवार प्रशांत जगताप यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर ठरलं..! भाजपच्या खासदाराला ठाकरे गटाकडून उमेदवारी, आज ठाकरे गटात प्रवेश
हेही वाचा…“वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं”, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका