वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अमर काळे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत काल महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. तर आज महायुतीकडून विद्यमान खासदार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. त्याआधी रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्जासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वर्ध्यातून कॉंग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचं आपण मनापासून आभार मानले पाहिजे. वर्ध्यातून कॉंग्रेस हद्दपार केलं, परंतु त्यांना उमेदवाराच सापेडना. याठिकाणी कुणी उभा राहायला तयार नव्हता. मग एक जण उभा राहिला. तो माझा मित्रच आहे. त्यांना माहिती होतं की मला विधानसभेत काही टिकाव लागणार नाही. किमान लोकसभेत शहीद होऊन राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं. अशी टिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
गांधींजीचं वर्धा हे शरद पवारांचं ना कॉंग्रेसचं आहे. ते फक्त मोदी आणि भाजपचं असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. रामदास तडस यांनी गेल्या दहा वर्ष लोकसभेत सातत्याने भूमिका घेतली आहे. रामदास तडस हे जनसामान्यांचे नेते म्हणून सगळ्या भागामध्ये लोकांसाठी उपलब्ध होत होते.
रामदास पैलवान आहेत. तसेही ते कुस्तीगिरी परीषदेचे अध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्ष कुस्तीगिरी पॅनेलवर शरद पवार यांचं वर्चस्व होतं. आता त्यांनाच पराभूत करत त्यांनी अध्यक्षपद मिळवलं आहे. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की त्यांच्या हातून कुस्तीगिरी परिषद निघून तडस साहेबांच्या हातात आली. सगळे डावपचे माहिती आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. वेळप्रसंगी असा डावपेच टाकतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही. असा हल्लाबोल देखील फडणवीस यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यांचा बैलगाड्याशी काहीही संबंध नाही, ते केवळ घोडीवर बसणारे”,आढळरावांकडून कोल्हेंची खरडपट्टी
हेही वाचा…“विखे मनाने अगदीच भिकारी निघाले”, लंकेंवर टिका, शरद पवार गटाकडून सुजय विखेंचा समाचार
हेही वाचा…“हिंगोलीमध्ये महायुतीत धुसफूस, हेमंत पाटलांची उमेदवारी जाणार, शिंदे अन् भाजपच्या आमदारांमध्ये गुप्त बैठका
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार