हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. यावरून हिंगोलीमध्ये सध्या महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात वाशिमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा*
भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे. त्यामुळे हिंगोतील महायुतीत उमेदवारीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट आहे. असं असताना आता महायुतीकडून या मतदारसंघाचा संयमाने विषय हाताळण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका
दरम्यान, हिंगोली लोकसभेबाबत भाजपने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला पदाधिकाऱ्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली. तसेच यावेळी उमेदवार बदलण्याचीही मागणी केली आहे. हिंगोलीत अशा राजकीय घडामोडी घडत असतांना आता हेमंत पाटील यांनी देखील असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कुच केली आहे.त्यामुळे आगामी काही दिवसात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…विकसित भारताचे स्वप्न होणार साकार, “कामगारांनी आपल्या प्रगतीसाठी यावेळी मोदींना साथ द्यावी,” मुरलीधर मोहोळांचे आवाहन
हेही वाचा…“घड्याळाला मत म्हणजे, विकासाला मत”, यंदा अजितदादांच्या विचारांचा खासदार होणार,- सुनेत्रा पवार
हेही वाचा…शरद पवारांनी थेट उमेदवाराच्या मिरवणूक रथात बसण्याचा हट्ट केला अन्.. सगळ्यांची तारांबळ उडाली, एकच चर्चा
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’