वर्धा : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर काळे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीकडून भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भव्य नामाकंन रॅलील शरद पवारांनी उपस्थिती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यातच सभा पार पडल्यानंतर शरद पवार गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखवली. मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार असा निर्धार केल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द पवार हजर झाले. प्रथम शरद पवार यांचे सभास्थळी स्वाध्यय मंदिर येथे आगमन झाले. भाषण आटोपल्यावर ते गर्दीतून वाट काढत निघाले. तेव्हा शरद पवार यांच्या सुरक्षारक्षाकांनी त्यांना त्यांच्या कारकडे वाट दाखविली. मात्र त्यात बसणार नाही तर उमेदवाराच्या मिरवणूक रथातच बसणार, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
अशी काही इच्छा शरद पवार व्यक्त करतील हे कोणाच्या ध्यानीमानी नव्हतेच. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. चढणार कसे असा प्रश्न आला. धावपळ झाली. मंदिरातील पायऱ्या असलेली शिडी आली. त्यावर चढून शरद पवार अखेर रथावर स्वार झालेच. हा त्यांचा उत्साह उपस्थित नेते तसेच पदाधिकारी यांना थक्क करून गेला.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या बॅंकेची खाती गोठवून त्यांचा व्यवहार थांबवण्याची भूमिका आज भाजप सरकारने केलेली आहे. ही स्थिती या देशामध्ये कधी नव्हती, आज ती या ठिकाणी निर्माण केलीय. लोकशाहीला आघात देणारी, मुलभूत अधिकार उद्धवस्त करणारी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर हमला करणाऱ्या विचारधारेचा पराभव करणं आणि या देशाच्या जनतेचं भविष्य हे योग्य राहिल याची काळजी घेणं हेच काम आपल्याला करायचं आहे व त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.आघाडीतील पक्षांच्या सामुदायिक सहकार्याने व कर्तृत्वाने आपण वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू असे यावेळी शरद पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…जळगावात भाजपचा खासदार ठाकरे गटाच्या गळाला, स्मिता वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
हेही वाचा…“वर्ध्यातून एक नवीन संदेश देशामध्ये पाठवू”, ‘आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचं पवारांचं आवाहन’
हेही वाचा…भोसरीत साकारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘‘बैलगाडा शर्यत शिल्प’’, भाजपा आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा*
हेही वाचा…“मिंधे गटातील अनेकांची तिकीटे कापली जाणार”, आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टिका
हेही वाचा…“पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेत, आता तुमच्या कामाचा हिशोब द्या “, आढळरावांनी कोल्हेंचा घेतला खरपुस समाचार