पुणे : शिरूर लोकसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. काल आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महायुतीच्या नेत्याची बैठक घेतली तर पेठ पंचायत समिती आणि मंचर पंचायत समिती कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यातून आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी पवार साहेबांच्या नावावर मत मागण्याचे दिवस गेलेत असं म्हणत आढळराव पाटलांनी कोल्हेंचा खरपुस समाचार घेतला.
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, शिरूर लोकसभेचा विकास सोडून लोकांना चंदेरी दुनियेत घेऊन जायचं आणि खोटी आश्वासन दाखवायची. त्यांना वाटतं की निष्ठा निष्ठा म्हणत शरद पवारांसोबत आहे. लोक पवार साहेबांच्या नावानं मत मागणारी असतील तर पवार साहेबांची गोष्ट वेगळी आहे. आपण वेगळो आहोत. शरद पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले आहेत. आता मतं मागायची असतील तर तुम्ही केलेल्या विकासावर मागा. मागील पाच वर्षात तुम्ही काय योगदान दिलं ? काय काम केलीत. यावर मत मागा. असा टोलाही आढळराव पाटलांनी कोल्हेंना लगावला.
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
त्यावर शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असणारच. त्यामुळे पवार साहेबांच्या नावावर निवडणुक होतेय. याचे दिवस जुने झाले तर त्यांचे विचार त्यांना लखलाभो. पवार साहेबांनी महाराष्ट्रात संपुर्ण महाराष्ट्रसाठी काय केलं हे प्रत्येक जण जाणतो. असं प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांना दिलं आहे.
दरम्यान, यातच काल आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला प्रंचड गर्दी दिसून आली. यावेळी महायुतीच्या सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी झपाटून हजेरी लावत ऊर्जेने उत्साही वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर महायुतीशी, जनतेशी, व देशाच्या विकासासाठी एकनिष्ठ असे समस्त कार्यकर्ते व पदाधिकारी महायुतीच्या नेतृत्वाखाली विजयी होण्यास सज्ज झाली असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटलांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…तिकीट कापलेले भाजप खासदार थेट राऊतांच्या भेटीला , जळगावात मोठा राजकीय भुंकप ?
हेही वाचा…“नवनीत राणांच्या विरोधात महायुतीच्याच नेत्यांनी नाराजीचा सुर आवळला”, अमरावतीत महायुतीला मोठा फटका बसणार
हेही वाचा…“एका तरुणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसूत्र विकले”, महाराष्ट्र्तील शेतकरी नेता निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका