बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज सादर केला आहे. परंतु त्याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली आहे. बुलढाण्यात शिंदे गटाच्याच नेत्यांमध्ये अशी बंडाळी असतांना आता याठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील मैदानात उतरले आहेत. रवीकांत तुपकर आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. त्यामुळे बुलढाण्यातील लढतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिली आहे.
हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध
सलग तीन टर्म खासदार असलेल्या प्रतापराव जाधवांच्या विरोधात रवीकांत तुपकर यांनी थंड थोपडले आहेत. विशेष करून रवीकांत तुपकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोकवर्गणीतून रक्कम जमा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, अनेक संघटना पाठिंब्यासाठी येतील. लढत ही फक्त महायुतीच्या उमेदवारामध्ये आणि माझ्यात होणार आहे. एका तरूणाने माझ्यासाठी त्याच्या बायकोचे मंगळसुत्र विकले आहे. सोबतचा अनेक लोक वर्गणी देत आहेत. भूमिपुत्र गाडीवर लिहून होत नाही. आपण कामातून दाखवून द्यायचं असतं की मी भूमिपुत्र आहे म्हणून. भूमिपुत्र आहे म्हणता तर सोयाबीन प्रश्नावंवर बोलेले तुम्ही असा सवालही त्यांनी जाधव यांना केलाय.
हेही वाचा…“भाजपच्या उमेदवाराला अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा विरोध, महायुतीत वाद आणखी वाढतच चाललाय”
मागील काही वर्षांपासून रवीकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. मध्यंतरी कापुस आणि सोयाबीन प्रश्नावरून तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले होतं. यातच आता तुपकर यांचा अर्ज भरण्यासाठी पंढरपुर सह इतर जिल्ह्यातून दाखल झाले आहे. यातच रविकांत तुपकर म्हणजे शेतकऱ्यांसाठी पांडुरंग. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नेत्याला दिल्लीला पाठवावं. इथल्या नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही. आज आम्ही शेतकरी तुपकर यांच्यासाठी झगडणार आहोत. शेतकऱ्यांनी त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. शेतकरी नेता दिल्लाला पाठवायला पाहिजे. असेही शेतकरी बांधव म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…तिकीट नाकारलं, ठाकरे गटात होणार दाखल, ? जळगावात भाजपचाच खासदार स्मिता वाघ यांना देणार ठक्कर
हेही वाचा…“यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले