IMPIMP

अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका

Congress fielded candidate against Abandekar in Akola; Dr. Ticket to Abhay Patil, Ambedkar's dual role

अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारिख जशी जशी जवळ येत आहे. तशी तशी निवडणुकीला चांगलीच रंगत येत आहे. सुरूवातीला अकोल्यात वंचितच्या विरोधात उमेदवार देणार नाही असे कॉंग्रेसने म्हटले होते. मात्र काल अचानक कॉंग्रेसने अकोल्यात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पुर्णविराम  मिळाली आहे. वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली नाही तर डॉ. अभय पाटील हे कॉंग्रेसचे उमेदवार असतील अशी अगोदरच शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आता खरी होतांना दिसत आहे.

हेही वाचा…हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या ‘पतित पावन संघटने’चा मोहोळांना पाठिंबा 

महाविकास आघाडीबरोबर आंबेडकरांच्या मागील दीड महिन्यापासून वाटाघाटी सुरू होत्या. महाविकास आघाडी आधी चार आणि नंतर सहा जागांचा प्रस्ताव आंबेडकरांसमोर ठेवला होता. मात्र आपल्याला किती जागा हव्यात याबाबत आंबेडकरांनी भूमिका न मांडता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट आपले उमेदवार जाहीर केले. आधी सात नंतर स्वत: ची अकोल्यातून उमेदवारी जाहीर करत एकूण २० उमेदवार आतापर्यंत वंचितने जाहीर केले आहेत . हे उमेदवार जाहीर करतांना कोल्हापुर, नागपुरसह  सात जागांवर आपण कॉंग्रेसला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा 

दरम्यान, डॉ. अभय पाटील यांना कॉंग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. अभय पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीत अधिकारी होती. निवडणुक लढविण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. डॉ. अभय पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही राजीनामाही दिला होता. मात्र शासनाने तेव्हा त्यांचा राजीनामा स्विकाराला नाही आणि त्यांना उमेदवारी जाहीर होऊनही निवडणुक लढवता आली नव्हती. मात्र यावेळी त्यांनी आता थेट निवडणुकीत उतरले आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन 

हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार

हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले 

हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध 

हेही वाचा…“भाजपच्या उमेदवाराला अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा विरोध, महायुतीत वाद आणखी वाढतच चाललाय”

हेही वाचा…महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही तसाच, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक 

Total
0
Shares
Previous Article
Subhash Deshmukh appeals to cast one vote of Solapur Lok Sabha in Modiji's pard and fight unitedly

"सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा," सुभाष देशमुख यांचं आवाहन

Next Article
This year, the name of the Garjana Mahayuti will be the same as the determination of the workers in Shirur for the victory of Adha Rao

"यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार", आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार

Related Posts
Total
0
Share