मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघाबाबत अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे याची अधिक चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालीय. यासह ज्याठिकाणी महायुतीत तिढा निर्माण झालाय. याबाबत महायुतीची बैठक पार पडलीय.
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक, रत्नागिरी-सिंधुदूर्ग तसेच अन्य मतदारसंघांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली. काय ठरले की ठरले नाही, हे गुलदस्त्यातच आहे.
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर
या बैठकीत ठाणे, कल्याण, नाशिक रत्नागिरी-सिंधुदूर्ग या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चारही मतदारसंघांबाबत शिंदेसेना आग्रही असून नेमका काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी या बैठकीत झाली. यावेळी कल्याण मतदारसंघआचे खासदार श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते.
ठाणे लोकसभेवरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर कल्याणमध्ये विद्यमान खासदार हा शिंदेंचा असून याठिकाणी भाजप आग्राही असल्याचे दिसून येत आहे. नाशिक तसेच रत्नागिरी-सिंधूदूर्ग या जागेवरूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपात भांडणं सुरू आहेत. याबाबत आता महायुतीत काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या ‘पतित पावन संघटने’चा मोहोळांना पाठिंबा
हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?