पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये सरळ लढत होणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात करून दिली आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्या गाठीभेटी वाढल्याचे दिसून येत आहेत. मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर भाजपला मिळालेले मताधिक्य टिकवून ठेवणे तर कॉंग्रेसला मताधिक्य वाढवणे असे आव्हान असणार आहे. त्यावर आता विजयाची गणिते अवलंबून आहेत. मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळच उजवे ठरतांना दिसत आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकरांसमोर आता मोहोळांचं मोठं आव्हान उभे राहिले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी ३ लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते. यामध्ये कोथरूड, वडगावशेरी, पर्वती, कसाब या विधानसभा मतदारसंघात याचा मोठा वाटा होता. या चार मतदारसंघात सध्या वेगाने हालचाली घडतांना दिसताहेत. याचा पुणे शहरांतर्गत पक्ष पातळ्यांवरचे राजकारण परिणाम २०२४ च्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…भाजपचा ‘तो’ मेगा प्लॅन सक्सेस ; लोकसभेपुर्वी विरोधी पक्षातील हजारो नेत्यांना भाजपात खेचले !
पुणे लोकसभेतील कोथरूड विधानसभा मागील काही वर्षांपासून चांगलीच चर्चेत राहिली आहे. या मतदारसंघातून भाजपला गेल्या निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक लीड मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलल्यानंतर तसेच पोटनिवडणुकीत ब्राह्मम समाजाची नाराजी मोठ्या प्रमाणात दिसून आली होती. मात्र याठिकाणी भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्याने भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे दिसून येत. त्यामुळेच आता कोथरूडमधून मोहोळ यांना २ लाखांपेक्षा अधिक लीड मिळवून देण्याचा कुलकर्णी यांनी विडा उचलला आहे. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस आणि ठाकरे गटात पक्षांतर्गत नाराजी दिसून आली आहे. त्यामुळे याचा फटका धंगेकरांना बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा तुम्हाला सोडली आता कसब्यासाठी आम्हाला शब्द द्या, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. इतकचं नाही तर शब्द दिला नाही तर आम्ही काम करणार नसल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गट आता भाजपकडे झुकले की काय अशी परिस्थिती याठिकाणी निर्माण झालीय. धंगेकरांनी मागच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला असला तरी ठाकरे गट याठिकाणी काम करणार की नाही ? याची शाश्वती आता येऊ लागल्याचे दिसत आहे.
हेही वाचा…५ वर्षामध्ये मतदारसंघांमध्ये का नव्हता? आता प्रचारासाठी वेळ कसा भेटला ? कोल्हेंविरोधात मतदारांची प्रंचड नाराजी
दुसऱ्या बाजूला वडगाव शेरीमध्ये २०१४ पासून भाजपच्या गोट्यातील मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ होतांना दिसत आहे. यातच उमेदवारी मिळाली नसल्याने माजी शहाराध्यक्ष जगदीश मुळीक नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर मुळीक देखील आता जोमाने कामाला लागले असल्याची माहिती आहे. यातच वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे याठिकाणी मोहोळांची ताकद धंगेकरांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.
पर्वती मतदारसंघात भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ आमदारकी टिकवण्यासाठी तर विधानसभेसाठी इच्छूक असलेले महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे तिकीट मिळण्यासाठी जोरात कामाला लागले आहेत. याचा आपसुकच फायदा मोहोळ यांना होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पर्वती मतदारसंघातील कॉंग्रेसचे स्थानिक नेते आबा बागूल यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने धंगेकरांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पुण्यामध्ये कॉँग्रेसची पारंपरिक मते आहेत.परंतु, त्याचा ठराविक आकडा ठरलेला आहे. आता बदललेली परिस्थिती, कॉँग्रेस पक्षामध्ये असलेली अंतर्गत सुंदोपसुंदी, केंद्र सरकारने पुणे शहरासाठी केलेली कामे. त्यामध्ये मेट्रो, चांदणी चौकातील आणि कर्वे रस्त्यावरील उड्डाण पूल, नदी सुधार प्रकल्पासाठी दिलेला निधी, देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल यासाठी लोहगाव येथील पुणे विमानतळ येथे उभारलेले एकात्मिक टर्मिनल या मोहोळ यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. या गोष्टींचाही परिणाम कोण किती मताधिक्य घेते यावर होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर
हेही वाचा…“बापू..! तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर, निकला चुहा’ ?”, शिवतारेंच्या विरोधातलं ‘ते’ पत्र व्हायरल