सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी सातारा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्याने शरद पवार आता नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर याबाबत शरद पवारांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरविण्यासाठी चर्चा करण्यात आली. याठिकाणी आता नवीनच नाव समोर येत आहे.
हेही वाचा…“एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार”, तुम्ही इंडिया आघाडीला निवडा,” उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन
सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतल्यानंतर याठिकाणी आता उमेदवार शोधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच आता याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण तुतारीवर लढणार की पंज्यावर लढणार त्यावर अजूनही शंका आहे.
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढत अटळ, कॉंग्रेस अन् भाजपमध्ये वंचित ठरणार गेम चेंजर ?
२०१९ साली देखील शरद पवार यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती होती. मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. तर साताऱ्याच्या जागेसाठी सुनील माने, सारंग पाटील, बाळासाहेब पाटील निवडणुक लढण्यासाठी इच्छूक असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे आता साताऱ्याबाबत शरद पवार काय निर्णय घेणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर
हेही वाचा…“बापू..! तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर, निकला चुहा’ ?”, शिवतारेंच्या विरोधातलं ‘ते’ पत्र व्हायरल
हेही वाचा…भाजपचा ‘तो’ मेगा प्लॅन सक्सेस ; लोकसभेपुर्वी विरोधी पक्षातील हजारो नेत्यांना भाजपात खेचले !
हेही वाचा…५ वर्षामध्ये मतदारसंघांमध्ये का नव्हता? आता प्रचारासाठी वेळ कसा भेटला ? कोल्हेंविरोधात मतदारांची प्रंचड नाराजी