नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीची दिल्लीत मोठी सभा पार पडली. या सभेसाठी संपुर्ण देशातील जवळपास २८ विरोधी पक्षाचे नेते दिल्लीतील राम लिला मैदानावर एकजुट झालेत. यावेळी विरोधकांनी अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावरून भाजपवर जोरदार टिका केली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टिका करत अब की बार भाजप तटीपार असा नारा दिला.
हेही वाचा…“पवार घराण्याने नेहमी झोडा आणि तोडा भूमिका घेतलीय”, पण आता..,” यशवंत ब्रिगेडने बारामतीत दोन्ही पवारांना दिलं आव्हान
दिल्लीच्या राम लिला मैदानावर राज्यातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी ठाकरे म्हणाले की, ४०० पारचा नारा भाजपने दिला आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचं सरकार देशासाठी घातक ठरणार आहे. आता ती वेळ आली आहे. एका पक्षाचं सरकार चालणार नाही. मी देशाला आवाहन करतो की इंडिया आघाडीला निवडा. समन्वय असलेलं आणि लोकांचा सन्मान करणारं सरकार आपल्याला आणायचं आहे. तसं करायचं नसेल तर तुमचं भविष्य कुणाच्या हाती द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, आम्ही निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचली पाहिजे म्हणून आलो आहे. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना तुरंगात टाकलं. याचं कारण काय ? ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते, त्यांना भापजपने त्यांच्या वॉशिंगमध्ये धुतलं आणि आपल्या बरोबर मंचावर बसवलं. असे भ्रष्ट लोक देशाचा विकास करू शकतात का ? आपल्या रॅलीला ठगोंका मेला म्हटलं आहे. इथे जमलेले लोक ठक आहेत का ? भाजपचे लोक भ्रष्टाचारी आहेत. अशी टिकाही त्यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढत अटळ, कॉंग्रेस अन् भाजपमध्ये वंचित ठरणार गेम चेंजर ?
हेही वाचा…“कॉंग्रेसला ‘या’ ७ जागांवर वंचितचा पाठिंबा , उरलेल्या जागांवर मैत्रीपुर्ण लढती”, आंबेडकरांनी घेतला वेगळा निर्णय
महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडाडणार ! लोकसभेसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर
हेही वाचा…कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंची डोकेदुखी वाढली ; सोलापुर लोकसभेतून वंचित उमेदवार देणार ?
हेही वाचा…हिंगोलीतील उमेदवार बदलण्याच्या मागणीला जोर, हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध
हेही वाचा…“आधी प्रचार करणार नाही म्हणाले, अन् आज थेट पेढे घेऊन दानवे खैरेंच्या घरी,” एकच चर्चा