नागपूर : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीसोबत युती करण्यास तयार असलेल्या वंचितने आता मैत्रीपुर्ण लढती करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐननिवडणुक तोंडावर आली असता वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आंबेडकर यांनी कॉंग्रेसला एकूण ७ मतदारसंघात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी मैत्रीपुर्ण लढती केल्या जातील. असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा ; समाधान दादा आवताडे यांचं जनतेला आवाहन
महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपुर्ण लढत अशी संकल्पना समोर आणली असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. सुरूवातीला कॉंग्रेसने सात जणांची यादी जाहीर केली. त्यानंतर ठाकरे गटाने १७ जणांची तर काल शरद पवारांनी एकूण ५ जणांची यादी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केली. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.
मैत्रीपुर्ण लढत होणार होती हे आम्हाला अगोदरपासून माहिती होते म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली की, महाविकास आघाडीचे भांडण आधी मिटवाते मिटलं की, आम्हाला मतदारसंघ मागायला सोपं जाईल. परंतु वंचित आम्हाला जागा देत नाही, कोणत्या पाहिजे ते सांगत नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. त्यांचा समझोता होत नाही, त्याठिकाणी आम्ही जाऊन त्यामध्ये बिघाड होण्याची परिस्थिती टाळण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काही महत्वाच्या भूमिका घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; लंके, सुप्रिया सुळे कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर
दरम्यान, पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना आम्ही पत्र लिहिले की महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला ज्या जागा दिल्या आहेत. त्यापैकी ७ जागांवर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. एक कोल्हापुर आणि दुसरी नागपूर अशा दोन जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलायउरलेल्या जागांची त्यांच्याकडून यादी येईल, त्यानुसार आम्ही त्यांना पाठींबा देऊ असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसने जाहीर केलेल्या यादीत लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ.शिवाजीराव काळगे, सोलापुर लोकसभेतून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, नंदुरबारमधून गोवल पाडवी, अमरावती मधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. याठिकाणी वंचितने कॉंग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांनी आता फक्त स्वत:ची आमदारकी सांभाळावी”, भाजपचा रोहित पवार उपरोधिक टोला
हेही वाचा…“कामगारांचा मुलगा अन् विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी”, लढाई जिंकणार कशी ? राम सातपुते यांनी सांगितली रणनिती
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू