सोलापुर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. या लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच एका कामगारांच्या मुलाच्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी अशी लढाई होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. समोर माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणुक कशी जिंकणार ? प्रचार कसा करणार आणि पुढील पाच वर्षात सोलापुरकरांसाठी काय काम करणार ? याविषयी राम सातपुते यांनी एबीपी माझ्या जय विरू या कार्यक्रमात सविस्तर भाष्य केले आहे.
हेही वाचा…पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील अन् आढळराव यांच्यात दिलजमाई ; कोल्हेंपुढे मोठी अडचण
कोणतीही निवडणुक असो भाजप अत्यंत ताकदीने निवडणुक लढवत आली आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं खेड्यापाड्यामध्ये प्रचंड जनसंपर्क आहे आणि या जनसंपर्काच्या जोरावर निवडणुक दहा दिवस आधी जरी जाहीर केली तरी आम्ही ती जिंकू शकतो. कारण सोलापुरातील ही निवडणुक एका बाजूची आहे. याठिकाणी ३ लाखांपेक्षा अधिक लीड घेऊन भाजप आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास देखील राम सातपुते यांनी व्यक्त केला आहे.
राम सातपुते यांनी माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली. सुशील कुमार शिंदे कित्येक वर्ष केंद्रात मंत्री होते. मात्र त्यांनी या मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाहीय. मात्र मागच्या वर्षात भाजपच्या नेत्यांनी कित्येक पटींनी विकास निधी आणला असल्याचे सातपुते यांनी सांगितले. त्याचबरोबर सोलापुर जिल्हा हा भाजपचा गड असून याठिकाणी कोणतीही गटबाजी दिसून येत नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जणांनी माझं जोरदार स्वागत केलं आहे. या मतदारसंघात प्रचंड संघर्ष करून भाजपने गड तयार केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी उमेदवार म्हणून भाजपचे प्रत्येकजण आपली ताकद लावून विजयी करणार. अशी आशाही त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे.
हेही वाचा…सोलापुरात राम सातपुते सेफ झोनमध्ये तर प्रणिती शिंदेंना बसणार मोठा फटका ; मराठा समाजाचा मोठा निर्णय
सोलापुरमधील युवकाला सोलापुरात राहून त्यांना इथेच काम मिळालं पाहिजे. याठिकाणी एमआयडीसीसारखे मोठे मोठे प्रकल्प आणले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार. मात्र या निवडणुकीत कोणतीही टिका टिप्पणी करणार नाही. फक्त सोलापुराच्या विकासावर बोलणार. मी कामगारांचा मुलगा अन् माझ्या विरोधात माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे, अशी लढाई आहे. लोकांचाही विश्वास माझ्यावर भरपुर असून त्यांचा आतापर्यंत उत्सुर्फ प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकी जायंट किलर ठरणार अन् ३ लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होणार असेही राम सातपुते म्हणाले.
मागच्या पाच वर्षात सोलापुरातील सर्वच रस्ते पुर्ण झाले आहेत. पायाभूत सोई सुविधा, रस्ते वाहतूक यामध्ये भाजपने चांगली कामे केली आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर आता एमआयडीसीच्या गाड्या धावल्या पाहिजे. अन् सोलापुरात मोठ मोठे उद्योग आले पाहिजेत. याच्यासाठी जीवाचं रान करेन, अन् सोलापुराच्या युवकांसाठी काम करणार असेही राम सातपुते यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ?” महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत
हेही वाचा…शिंदे कुटुंबीयांना आम्ही वैतागलोय, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात मोठा रोष
हेही वाचा…मोहोळांना विजयी करण्यासाठी सर्व आघाड्या लागल्या कामाला ; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका सुरू
हेही वाचा…“मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा ; समाधान दादा आवताडे यांचं जनतेला आवाहन
हेही वाचा…शरद पवार गटाचे पाच उमेदवार जाहीर ; लंके, सुप्रिया सुळे कोल्हेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर