सोलापुर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुर मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आमनेसामने येणार आहेत. राम सातपुते आणि प्रणिती शिंदे पहिल्यांदाच सोलापुर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढणार आहेत. यातच आता दोन्ही नेत्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुर शहरात सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजातील उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माऊली पवार यांनी माध्यमांसमोर बोलतांना दिलीय. सोलापुर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार राम सातपुते आणि कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना घाम फोडणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
शुक्रवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न झाली. अनुसुचित जाती प्रवर्गातील पंधरा दलित बांधवांनी मराठा समाजातर्फे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. पंधरा जणांमधून एकाची निवड होऊन त्या उमेदवाराला मराठा समाज संपुर्ण पाठिंबा देणार आहे.
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल
दरम्यान, मागील काही महिन्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता. याच दरम्यान मराठा समाजाच्या रोषाला प्रणिती शिंदे यांना सामोरे जावं लागलं होतं. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या गाड्या देखील मराठा समाजाने अडवल्या होत्या. तर त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती. त्यामुळे मराठा समाजाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिंदेंना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद वाढला, भुजबळांच्या दाव्याने खळबळ, दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक
हेही वाचा…“शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना..”बारामतीतून माघार घेतल्याने शिवतारेंना पवारांनी डिवचलं
हेही वाचा…ना मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, ना फडणवीसांचं ; ‘तो’ एक फोन आला अन् शिवतारेंनी बारामतीतून घेतली माघार
हेही वाचा…चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार ; मात्र वडेट्टीवार समर्थक भाजपात दाखल
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम