चंद्रपुर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. असे असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक एकेक करून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी होत असल्याने कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण आहे. चंद्रपुर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात वडेट्टीवार समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे हे राजकीय नाट्य सुरू आहे का ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !
भाजपने चंद्रपुर लोकसभेतून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसकडून माजी खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्यासह त्यांच्या कन्या शिवानी वडट्टीवार निवडणुक लढण्यास इच्छूक होती, मात्र कॉंग्रेसने धानोरकर यांच्यावर विश्वास टाकला आहे.
यातच दोन दिवसांपुर्वी गडचिरोलीचे कॉंग्रेसचे नेते डॉ. नितीन कोडवते व त्यांची पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी कॉंग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत तिकीट विकल्या जातात, असा गंभीर आरोप करून भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे याच कॉंग्रेसकडून डॉ. उसेंडी एक वेळा आमदार राहिले असून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली आहे. या तिन्ही वडेट्टीवार समर्थकांनी राजीनामा दिलाय.
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याच्या आधी चंद्रपुर लोकसभेसाठी वडेट्टीवार यांनी मोठी तयारी सुरू केली होती. मात्र दुसऱ्या बाजूला प्रतिभा धानोरकर यांनी निवडणुक लढण्याची मागणी लावून धरली. अखेर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची रात्री उशिरा उमेदवारी जाहीर केली आहे. याआधी बाळु धानोरकर यांनी भाजपच्या उमेदवारावर मोठा विजय मिळवला होता.त्यामुळे या जागेकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ नेता वर्ध्यातून तुतारीवर लोकसभा लढणार ; आघाडीत वर्ध्याचा जागेचा तिढा संपुष्टात
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार