वर्धा : वर्ध्याची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आली आहे. मात्र उमेदवार ठरविताना पक्षाच्या नाकीनऊ आले होते. गेल्या काही दिवसापासून कॉंग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना तुतारीवर लढणार असल्याची चर्चा होती. . मात्र त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नव्हता. त्यामुळे काळे यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काल प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे वर्ध्यातून लोकसभेसाठी काळे तुतारीवर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का
वर्धा लोकसभेवरून महाविकास आघाडीत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. याठिकाणांहून अनेक जण निवडणुक लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र अमर काळे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे येथील जागेचा तिढा जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मुंबईत काळे याच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. असे असले तरी काळे यांनी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात
दरम्यान, अमर काळे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशावेळी माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार सुरेश देशमुख, वर्धा जिल्ह्याध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस किशोर माथणकर, राजाभाऊ ताकसांडे, आफताब खान, कराळे गुरूजी, सुधीर कोठारी आदी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…लातूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का, ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांची सुन भाजपात दाखल
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी