लातूर : लोकसभा निवडणुकीचा राज्यात धुराळा उडाला आहे. काही ठिकाणी प्रचाराला सुरूवातही करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के बसतांना दिसत आहेत. यातच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना चाकूरकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे याची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे. तर कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात
2019 सालीच अर्चना पाटील चाकूरकर या भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचा भाजपमधील पक्ष प्रवेश थांबला. यातच काल अर्चना चाकूरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. यातच आज मुंबईत त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडून भाजपचं कमळ हाती घेतले आहे. यावेळी कॉंग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपचा झेंडा हाती घेतला.
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपात दाखल झाल्या आहेत. यामुळे मराठवाड्यात भाजपात प्रवेश करणाऱ्या या नेतेमंडळीमुळे कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र या नेत्याच्या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.
काही दिवसांपुर्वी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनीही भाजपात प्रवेश केला होता. येत्या काळात कॉंग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. त्यामुळेच अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…‘त्या’ तीन जागांसाठी शिंदेंना हवा १६ आकडा, नाहीतर अनेक मतदारसंघ त्यागाची वेळ येणार
हेही वाचा…शरद पवार गटातील उमेदवारांची नावे जाहीर होणार ; शरद पवारांचे ‘दहा’ शिलेदार लोकसभेसाठी तयार
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का