मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाकरे गटाने तब्बल १७ उमेदवारांची यादी अलिकडेच जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसने एकूण ७ उमेदवारांची यादी घोषी केलीय. दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला लोकसभेच्या १० जागा मिळण्याची शक्यता आहे. यातच आज शरद पवार गट आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…लक्षद्वीपमध्येही घड्याळ चिन्ह वापरता येणार ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट लक्षद्वीपमध्ये आमनेसामने
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्याा मामा उर्फ सुरेश म्हात्रे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली ; धुळ्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडेना
माढा, बीड, रावेर, सातारा आणि वर्धा लोकसभेचे उमेदवार ठरवणं बाकी आहे. परंतु बीडमधून बजरंग सोनवणे, रावेरमधून रवींद्र भैय्या पाटील, भिवंडीतून बाळ्या मामा म्हात्रे, वर्ध्यातून अमर काळे माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची शक्यता आहे. यातच लोकसभा निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात लढती होणार आहे. काही ठिकाणी या दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकरीता सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिल आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नरहरी झिरवाळांच्या चिरंजीवांनी भारती पवारांच्या विरोधात ठोकला शड्डू ; दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट !
हेही वाचा…मुरलीधर मोहोळांची ताकद दिवसेंदिवस वाढतेय ; प्रचारात घेतली जोरदार आघाडी
हेही वाचा…“राजकारणात बच्चू कडूचा कुणी बाप नाही”, बच्चू कडूंचा राणांच्या विरोधात लढण्याचा निर्णय पक्का
हेही वाचा…“तुमचं आडनाव शिंदे म्हणून तुम्हाला उमेदवारी ;” राम सातपुते यांचा प्रणिती शिंदेंवर घणाघात
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ