सोलापुर : महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे लोकसभेची निवडणुक लढणार आहेत. यातच आता राम सातपुते यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासह सुशील कुमार शिंदे यांच्यावर जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
तुमचं आडनाव शिंदे आहे म्हणून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याच मतदारसंघात शिंदे कुटुंबियांना जनता कंटाळली आहे. मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर सोलापुर मध्य मधून भाजपच्या उमेदवारांना मोठं लीड मिळालं होतं. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना फक्त ५१ हजार मतं मिळाली होती. तिथून भाजपला जवळपास ३७ हजारांचं लीड मिळालं होतं. असेही राम सातपुते यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, ज्यांचा वारसा चालवत आहे, ज्यांना अनुकंपाने तिकीट मिळालं आहे. कुठेतरी काही तरी पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. परंतु ही निवडणुक विकासासाची, सोलापुरमध्ये विकास झाला पाहिजे. याविरोधात होणार आहे. मला विश्वास आहे की, २०२४ च्या निवडणुकीनंतर सोलापुरमधील कोणत्याही युवकाला, महिलांना तसेच व्यक्तींना मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे मी उच्चशिक्षित्र असून सामान्य परिवारातून पुढे आलो आहे. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. तसेच येत्या काळामध्ये सोलापुरात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. औद्योगिक विकास, रस्तेवाहतूक, तसेच सोलापुरमध्ये युवकांना काम मिळालं पाहिजे. या मुद्द्यांवरून आम्ही काम करणार आहोत. असेही राम सातपुते यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..अन्यथा पुण्यात लोकसभेचं काम करणार नाही,” पुण्यात ठाकरे गट आक्रमक, धंगेकरांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…लक्षद्वीपमध्येही घड्याळ चिन्ह वापरता येणार ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट लक्षद्वीपमध्ये आमनेसामने
हेही वाचा…प्रबळ उमेदवाराच्या शोधात अजूनही कॉंग्रेस घुटमळली ; धुळ्यात कॉंग्रेसला उमेदवार सापडेना
हेही वाचा…“वसंत मोरे वंचितकडून पुणे लोकसभा लढणार ? मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट”
हेही वाचा…राम सातपुते यांच्या पाठीमागे महायुतीची मोठी ताकद ; सोलापुर लोकसभेत कॉंग्रेसचा पराभव अटळ