सोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राम सातपुते यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. सातपुते यांनी प्रचाराच्या पहिल्याच सभेतून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापुरमधील राजकीय वातावरण चांगलचं पेटण्याची शक्यता आहे.
राम सातुपते म्हणाले की, कॉंग्रेसने आतापर्यंत राजकारणात नेहमी घराणेशाही केली आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बालपण गेलेल्या उमेदवाराला कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. असे म्हणत त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तर गरीब घरातील उमेदवार कॉंग्रेसकडे नव्हते का ? असा सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन
सोलापुर लोकसभा मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद दिसून येत आहे. सहा विधानसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ सोडला तर सर्वच आमदार हे महायुतीत सध्या सामील आहेत. सोलापुर उत्तर मधून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख,सोलापुर दक्षिण मधून भाजपचेच सुभाष देशमुख, अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, पंढरपुरमधून समाधान आवताडे, मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवारगटातील आमदार यशवंत माने सातपुते यांच्या पाठीमागे आहे. सोलापुर मध्य विधानसभा मधून आमदार प्रणिती शिंदे असून याठिकाणी सातपुते यांच्या पाठिमागे महायुतीची मोठी ताकद उभी आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सातपुते यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांचा मोदी लाटेत पराभव झाल. त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला. तर २०१४ पासून हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात राहिला आहे. २०१९ मध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी निवडून आले. तेव्हा त्यांनी सुशील कुमार शिंदे यांचाच पराभव केला. आता भाजपकडून राम सातपुते यांचा सामाना प्रणिती शिंदे यांच्याशी होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटलांचा नकार, शरद पवारांनी इच्छूक उमेदवारांची केली नावं जाहीर
हेही वाचा…मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी ; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार