छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीकरीता उमेदवार ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्यानंतर मोठा राडा बघायला मिळाला. या बैठकीत विकी पाटील नावाच्या तरूणाला बैठकीत बेदम मारहाण झालेली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना बोलावण्यात आलं होतं. तसेच बैठकीत कोणत्याही प्रकारे व्यक्तीचं नाव न घेतल्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र या बैठकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचं नाव घेतल्याने विकी पाटील याला मारहाण करण्यात आली आहे. यावेळी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याचे दिसून येत आहेत. अंबादास दानवे यांची नाराजी दुर करण्यासाठी दोघेही नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे अंबादास दानवेंची नाराजी कशा पद्धतीने दुर करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगर!
मराठ्यांच्या बैठकीत एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण…pic.twitter.com/Hrk7sacCi2
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) March 29, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“तुर्तास तरी माघार नाही”, शिंदेंच्याच आमदाराने महायुतीच्या विरोधात ठोकला शड्डू
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचे पुत्रही वेटिंगवर, महायुतीत ‘या’ जागांवर असूनही सस्पेन्स कायम !
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा