मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाने सांगली, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर आपले उमेदवार घोषीत केले आहे. तर महायुतीत वादात अडकलेल्या नाशिक, ठाणे, पालघर, सिंधुदूर्ग-रत्नागिरी, औरंगाबाद, उत्तर-पश्चिम मुंबई या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाचे उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे जागावाटपाचा सस्पेन्स अजूनही कायम राहिला आहे.
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्या आठ उमेदवारांची घोषणा करताना वादग्रस्त जागांना हात न लावण्याचा पवित्रा घेतला आहे. नाशिकवरून शिंदे गट अन् अजित पवार गटात रस्खीखेच सुरूच आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीवरून सातत्याने शिंदेंना भेटत आहेत. सिंधुदूर्ग-रत्नागिरीसाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिंदेंकडे जोर लावला आहे.
तर औरंगबादची जागा आपल्याकडे घ्या, असा तेथील नेत्यांचा शिंदेंवर दबाव कायम आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. तर ठाणे आणि पालघर भाजपला हवे आहे. शिंदे या जागा सोडायला तयार नाहीत. असे चित्र सध्या दिसतेय. पालघरमध्ये राजेंद्र गावित हे शिंदे गटाचे खासदार असून शिंदे ठाणे दार असल्याने अडले आहेत. औरंगाबाद, सिंधुदूर्ग-रत्नागिरी व ठाणे वगळता वादातील अन्य खासदार शिंदे गटाचे आहेत.
हेही वाचा….अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…
बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला असला तरी एबी फॉर्म जोडलेला नाही. या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिलीय. गायकवाड यांचा हा स्टेंट असल्याचे म्हटले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही. कल्याणसह कोकणातील भाजप-शिवसेनेचे जागावाटप अंतिम व्हायचे असल्याने ते वेटिंगवर आहेत. यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी की संजय राठोड की आणखी कोण हा सस्पेन्सही कायम ठेवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा ; ? विखेंच्या विरोधात लोकसभा लढवणार
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?