अहमदनगर : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही गट लोकसभेच्या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. भाजपसह शिवसेना शिंदे गट, कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाने अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा केली नाही. यातच आता अजित पवार गटातील आमदार निलेश लंके आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा….अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…
दक्षिण नगरमधून भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर याठिकाणांहून आमदार निलेश लंके निवडणुक लढण्यास इच्छूक आहेत. लंके सध्या अजित पवार गटात असले तरी त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. यातच आज पत्रकार परिषद घेऊन लंके पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्याआधी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यापुर्वी लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन लंके यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा परतण्याचे संकेत दिले होते. यातच आता लंकेंना शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत लंके काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले”, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचं निधन
हेही वाचा…“भाजपची मदत घेऊन उद्या कॉंग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर..,” शिंदेंच्या उमेदवाराला भाजपाचा कडक इशारा
हेही वाचा…शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर ; 7 जणांना पुन्हा संधी, तर एका जागेवर कॉंग्रेसच्या नेत्याला लॉटरी
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?