मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ज्यांची प्रतिक्षा लागून राहिली होती. त्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सात खासदारांवर विश्वास टाकत त्यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. आठ उमेदवारांची घोषणा केली असून कॉंग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या आमदार राजू पारवे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा…“राऊतांनी तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं”, आंबेडकरांचा मोठा आरोप
शिवसेना बंडाच्या वेळी सोबत आलेल्या खासदारांनाच शिंदे यांनी आपली पहिली पंसती दिल्याचे जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे . यामध्ये मावळातून श्रीरंग बारणे, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर रामटेकमधून राजू पारवे यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा…निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द
भाजपच्या सर्वेक्षणांत शिंदे गटाच्या खासदारांबाबत नाराजीचे वृत्त होते, त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना संधी नाकारणार अशी चर्चा होती. मात्र शिंदेंनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला बुलढाण्यात उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बंडाळी झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बंड पुकारून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याठिकाणी शिंदेंनी प्रतापराव जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे याठिकाणी संजय गायकवाड आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का ? की निवडणुक लढणार ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा तणावाचा ठरणाऱ्या मावळ लोकसभेचा तिढा अखेर सुटला आहे. मावळच्या जागेवर शिवसेना शिंदे गटासह भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा सांगितला होता. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तर भाजपचे बाळा भेगडे यांनी आपली मागणी जोरदारपणे लावून धरली होती. मात्र याठिकाणी बारणे यांनी उमेदवारी जाहीर होताच भाजपसह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मावळ भूमिका घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मावळात बारणे विरूद्ध वाघेरे यांच्यात लढत ; बारणे विजयाची हॅट्रिक साधणार का ?
हेही वाचा…नवनीत राणा कमळावर निवडणूक लढवणार ; अडसूळ आणि बच्चु कडू महायुतीचा धर्म पाळणार का ?
हेही वाचा..अमोल कोल्हेंचा शिवाजीराव आढळराव पाटलांना वाकून नमस्कार, म्हणाले…
हेही वाचा…“मला कोणाचाही पराभव करण्यासाठी लढायचं नाही”, सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…अभिनेता गोविंदा शिंदे गटात दाखल ; गोविंदाला अमोल किर्तीकरांचं आव्हान पेलणार का ?